न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जून २०१९) :- महापालिकेच्या ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत चिंचवडगावामधील प्रभाग क्र. १७ व १८ मध्ये पालिकेच्या वतीने मंगळवारी (दि. ११) रोजी १३ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. चिंचवडगावातील केशवनगर, चिंचवड गावठाण व वाल्हेकरवाडी येथे ही करण्यात आली.
या कारवाईत हरितपट्टा व पूररेषेतील १, व्यवसायिक ६, निवासी ४ व औद्योगिक २ अशा अंदाजे ११ हजार ४६९ चौरस फुटाच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली. तसेच एका मोबाईल टॉवरची विद्युत वाहिनी खंडीत करण्यात आली. कार्यकारी अभियंता सतीश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता रामनाथ टकले, कनिष्ठ अभिंयता व बीट निरीक्षकांच्या पथकाने ही कारवाई केली. कारवाईसाठी २ जेसीबी, प्रत्येकी १ ट्रैक्टर ब्रेकर, ट्रक, ७ मजूर अशी यंत्रणा वापरण्यात आली.














