न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जून २०१९) :- पवना धरणात १८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, तो जुलैअखेरपर्यंत पुरेसा राहिल इतका आहे. तोपर्यंत पावसामुळे धरणाची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.
पवना धरणात कमी पाणी साठा असल्याने तो जुलै महिन्यापर्यंत पुरावा म्हणून जलसंपदा विभागाने पालिकेस पाणी कपात करण्याबाबत वारंवार सुचित केले होते. वाढत्या उन्हामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात होणारे न बाष्पीभवन लक्षात घेऊन झपाट्याने पाणी साठा घटत होता. त्यामुळे खबरदारी म्हणून पालिकेने १ मार्चपासून आठवड्यात एकदा पाणी बंदची अंमलबजावणी सुरू केली आहे.














