न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नाल्याची व पावसाळी गटारांची सफाई अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे मान्सूनपूर्व पावसात शहरातील अनेक भागांत पाणी साचून घरात व दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते, अशी तक्रार लोक जनशक्ती पार्टीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
शहातून वाहणारे सर्व छोटे व मोठे नाले तसेच, पावसाळी गटारे पूर्णपणे स्वच्छ करण्याची गरज आहे. मात्र, पावसाळापूर्वी ही सफाई पूर्ण झालेली नाही, अशी तक्रार पार्टीचे जिल्हाध्यक्ष नसीम शेख यांनी केली आहे.














