न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जून २०१९) :- महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे सेवानिवृत्त झाले आहेत. त्याच्याकडील कर संकलन, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन, कामगार कल्याण, आकाशचिन्ह व परवाना आणि अभिलेख कक्ष हे ६ विभाग अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
त्या संदर्भातील आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी काढला. अतिरिक्त आयुक्त (एक) पाटील यांच्याकडे स्थापत्य मुख्यालय, स्थापत्य (उद्यान), प्राथमिक शिक्षण विभाग, मोरवाडी व कासारवाडी आयटीआय, निवडणूक व जनगणना, वैद्यकीय, वायसीएम रूग्णालय, पशु वैद्यकीय, विद्युत मुख्य कार्यालय, कार्यशाळा, दूरसंचार, झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन (स्थापत्य), उद्यान व वृक्ष संवर्धन, नागरी सुविधा केंद्र हे विभाग आहेत. अतिरिक्त आयुक्त (दोन) गावडे हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्याकडील ६ अतिरिक्त विभागांची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवली आहे.














