न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०१९) :- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड शिक्षण विभागाच्या वतीने ‘नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे कॅलेंडर’ करण्याचे काम सुरु आहे. या कॅलेंडरमध्ये भाषा, गणित अशा विषयांचा मूलभूत विकास होण्यावर भर असणार आहे.
दप्तपराविना शाळा, आनंददायी गृहपाठ या बाबींचाही यात समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली. वर्भषरात शाळांमध्ये दररोज काय आणि कोणते उपक्रम घ्यावे यासंबंधीची माहिती शाळांना होण्यासाठी दैनंदिन नावीन्यपूर्ण आनंददायी उपक्रमांचे कॅलेंडर करण्यात आले आहे.
महापालिकेच्या शाळा क्र. ९३ मधील सोनावणेवस्तीच्या शाळेमध्ये अशाप्रकारचा उपक्रम राबवण्यात आला होता. शाळेतील शिक्षक रामदास मेचे यांची ही संकल्पना आहे. या शाळेत सुरू केलेल्या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना फायदा झाला. या शैक्षणिक कॅलेंडरमुळे शाळेची गुणवत्ता वाढीस लागली, अशी माहिती शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी दिली.














