न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०१९) :- अण्णासाहेब मगर बँकेत सद्यस्थितीत चालू असलेला कारभार, आर्थिक परिस्थिती, कर्जवाटप व त्याच्या वसुलीत होत असलेला हस्तक्षेप आणि जाणुबुजून होत असलेली दिरंगाई, याच्याशी असहमत असल्याने बँकेचे माजी उपाध्यक्ष, ज्येष्ठ संचालक विठ्ठल पांडुरंग सांडभोर, सुलोचना रामेश्वर भोवरे आणि सविता दिलीप मोहरुत या तिघांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक, पुण्याचे जिल्हा उपनिबंधक व निवडणूक निर्णय अधिकारी, सहकार आयुक्त व सचिव यांना राजीनाम्याची प्रत, पाठविली आहे.
उर्वरित संचालक मंडळ आमचे राजीनामे मंजूर करण्यास दिरंगाई करण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकेने आपल्या अधिकारात हे राजीनामे त्वरित मंजूर करुन आमच्या जागा रिक्त झाल्याचे कळविण्याची विनंती तिघांनीही सहकार आयुक्त, उपनिबंधक व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे.











