न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूरोड (दि. २० मे २०२६) :- देहूरोड परिसरात सार्वजनिक रस्त्यावर अश्लील हावभाव करून नागरिकांना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोन महिलांविरोधात देहूरोड पोलिसांनी कारवाई केली आहे.
मुंबई-बंगळुरू जुन्या महामार्गावरील किवळे ब्रिजजवळील परिसरात महिला आरोपी सार्वजनिक ठिकाणी वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने अश्लील हावभाव करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास देहूरोड पोलीस करत आहेत.














