न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २० मे २०२६) :- पिंपरीतील सिटी प्लाझा लॉजसमोरील सार्वजनिक रस्त्यावर गैरवर्तन केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस कर्मचारी उदयकुमार भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संबंधित महिला सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव आणि खुणा करून नागरिकांना अडथळा निर्माण करत होती.
याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.














