न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूरोड (दि. २० मे २०२६) :- देहूरोड परिसरातील स्वर्ग लॉजसमोरील सार्वजनिक रस्त्यावर अश्लील हावभाव करून नागरिकांना त्रास दिल्याप्रकरणी दोन महिलांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस शिपाई समाधान पटावकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, महिला आरोपी सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांशी अश्लील हावभाव आणि शब्दांचा वापर करून सार्वजनिक शिष्टाचाराचा भंग करत होत्या. या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे.














