न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ मे २०२६) :- बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची ५ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
प्रशांत मोहन गायकवाड असे अटक आरोपीचे नाव आहे. फिर्यादी सुजितकुमार भोसले यांना आरोपीने जनता सहकारी बँकेत गहाण ठेवलेले ६० ग्रॅम सोने सोडवण्यासाठी पैसे आणण्यास सांगितले. याबाबत लेखी करार करून विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर फिर्यादींकडून ५.१० लाख रुपये आरोपीच्या बँक खात्यावर जमा करून घेण्यात आले. मात्र सोने न सोडवता आरोपी बँकेतून निघून गेला.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पिंपरी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.














