न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. २१ मे २०२६) :- शेअर्स मार्केट आणि आयपीओमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल ३५ लाख २८ हजार रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार हिंजवडी येथे उघडकीस आला आहे.
प्रतिमा बनसल आणि मयांक सचान या आरोपींनी विविध मोबाईल नंबर व व्हॉट्सअॅपद्वारे फिर्यादीशी संपर्क साधला. त्यानंतर विविध इन्व्हेस्टमेंट ग्रुपमध्ये अॅड करून केवायसी अपडेट करण्यास सांगितले. अधिक गुंतवणूक केल्यास शेअर्स आणि आयपीओमधून मोठा फायदा करून देऊ, असे सांगून आरोपींनी विश्वास संपादन केला.
त्यानंतर विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करून घेत फिर्यादीची ३५.२८ लाखांची फसवणूक केली. हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.














