न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून २०१९) :- शाळा महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची तहसील कार्यालय, नागरी सुविधा केंद्रावर गर्दी होत आहे. दहावी-बारावीच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नॉन-क्रिमीलेअर, अधिवास/डोमेसाइल/रहिवासी, जातिचा दाखला, उत्पन्नाचा दाखला आदी ऑनलाईन दाखले देण्यासाठी जिल्हा पातळीवर केवळ एकच सर्व्हर उपलब्ध आहे.
तांत्रिक अडचणी आल्यास दाखले देण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालय प्रशासने केवळ ह्या दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी अडवणूक करू नये, असे आवाहन तहसीलदार गीता गायकवाड यांनी केले आहे.















