न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून २०१९) :- पार्लिमेंटरी एक्झिक्युटिव्ह कमिटी व राज्यसभेच्या पक्षप्रतोदपदी पुनः निवड झाल्याबद्दल खासदार अमर साबळे यांचा पिंपरी चिंचवड शहर भाजप व पदाधिका-यांकडून नुकताच सत्कार करण्यात आला.
साबळे यांनी मोदी सरकारमध्ये पुन्हा एकदा राज्यसभेतून पक्षप्रतोद म्हणून जबाबदारी मिळाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तसेच सर्व कार्यकर्त्यांनी दिलेल्या सदिच्छांबद्दल धन्यवाद दिले.
यावेळी साबळे यांनी त्यांचा झालेला सत्कार हा भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्याचा पक्षश्रेष्ठींनी केलेला सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच माझ्यावर दाखवलेला हा विश्वास सार्थ ठरवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन, असेही त्यांनी यावेळी सांगितले.















