न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २९ मे २०२६) :- ऑल स्पोर्ट्स अँड मार्शल आर्ट्स फेडरेशन ऑफ पुणे यांच्या वतीने विविध क्षेत्रातील २६ मान्यवरांना ‘सरस्वती भूषण गुणगौरव पुरस्कार २०२६’ देऊन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. महापौर कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात बोलताना समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सुनील साठे, मनोज सोनावणे आदी उपस्थित होते. इरा सोनावणे यांनी महापौरांच्या कार्यावर आधारित कविता सादर केली.
मनोज साळवे, सम्यक कांबळे, जितेंद्र शिंगारे, इस्प्रित कटारिया, उर्मिला जाधव, दिपाली भादुले, डॉ. मंजुषा इंगवले, विश्वास गरजमल, युवराज कांबळे, विजय भस्मे, हेमराज थापा, सुधा ढवळे, गणेश ठोकळ, सुदेश गायकवाड, राजेंद्र कांबळे, जितू कटारिया, धर्मपाल भरणे, रोहित आढागळे, श्रीधरण थांबा, श्वेता लिमन, मयंक कांबळे, प्रतिभा भोसले, रमेश शेलार आणि पूजा भोसले यांचा सन्मान करण्यात आला.















