- परिसर अजूनही संवेदनशील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ४ जून २०२६) :- फुगेवाडी विषारी दारूकांड प्रकरणाच्या तपासासाठी घटनास्थळी जाणाऱ्या सीआयडीच्या पथकांना स्थानिक पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त सोबत घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दारूकांडानंतर परिसरातील वातावरण अद्यापही संवेदनशील असून आरोपींविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप कायम आहे.
दोन दिवसांपूर्वी सीआयडीचे पथक मुख्य आरोपी कर्नेलसिंह तख्तसिंग वीरका याला तपासासाठी घटनास्थळी घेऊन आले असता मृतांच्या नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. काहींनी आरोपीला घेराव घालण्याचा तर काहींनी दगडफेक करण्याचाही प्रयत्न केला. परिस्थिती चिघळण्याची शक्यता ओळखून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आरोपीला सुरक्षित बाहेर काढले.
दरम्यान, मुख्य आरोपी वीरका यांच्या घरावर कारवाईच्या हालचालींनाही वेग आला आहे. महापालिकेकडून नोटीस बजावल्यानंतर घरातील साहित्य बाहेर काढण्याचे काम सुरू असून परिसरात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.















