न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १८ जून २०२६) :- शासकीय जनगणनेचे काम पूर्ण करून महापालिकेच्या ‘फ’ प्रभाग कार्यालयात आलेल्या एका शिक्षिकेशी गैरवर्तन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याप्रकरणी महापालिकेच्या नगर नियोजन विभागातील कर्मचारी दिलीप आडे (वय ४५) यांच्याविरुद्ध निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका खासगी शैक्षणिक संस्थेत कार्यरत असलेल्या ४७ वर्षीय शिक्षिकेने याबाबत फिर्याद दिली आहे. कार्यालयात उपस्थित असताना संबंधित कर्मचाऱ्याने गैरवर्तन केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून या घटनेमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.















