न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २१ जून २०२६) :-पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी २८ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्ती घेतल्यानंतर शहर अभियंता पद अद्याप रिक्त आहे. या पदाचे कामकाज तात्पुरत्या स्वरूपात मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे तसेच सहशहर अभियंते मनोज सेठिया आणि सुनील भागवानी यांच्याकडे सोपवण्यात आले होते.
दरम्यान, सहशहर अभियंता सुनील भागवानी यांच्याकडे असलेले बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कामकाज आता सहशहर अभियंता मनोज सेठिया यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे.
तसेच महापालिकेच्या स्थापत्य विभागातील उपअभियंता सुदर्शन वहिकर यांना कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या बदलांमुळे अभियांत्रिकी विभागाच्या कामकाजात अधिक सुसूत्रता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.















