- ५० एकर शासकीय जमीन मंजूर..
- मुख्यालय, परेड ग्राऊंडसह प्रशासकीय सुविधा उभारणार…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.०२ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या स्वतंत्र मुख्यालयाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या वळुमाता प्रक्षेत्रातील २० हेक्टर (सुमारे ५० एकर) शासकीय जमीन पोलिस आयुक्तालयाच्या मुख्यालय, परेड ग्राऊंड व इतर सुविधांसाठी देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबत महसूल व वन विभागाने १ जुलै रोजी शासन निर्णय जारी केला.
या जागेवर स्वतंत्र प्रशासकीय संकुल, परेड ग्राऊंड आणि आवश्यक सुविधा उभारण्यात येणार आहेत.
संबंधित जमीन पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड यांच्या नावे वर्ग करण्यात येणार असून, शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय तिचा इतर कोणत्याही कारणासाठी वापर, विक्री, हस्तांतरण किंवा भाडेपट्टा करता येणार नाही.
















