न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०१९) :- थेरगाव, वाकड येथे श्रीकृष्ण कॉलनीमध्ये जाधव यांचे घर आहे. त्यांच्या घरात फिर्यादी महिलेचे कुटुंब भाड्याने राहते. फिर्यादी महिलेकडून घराचे भाडे देण्यासाठी उशीर झाला. त्यावरून घरमालक पती-पत्नीने मिळून भाडेकरूंना पती-पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच घरातील टीव्ही, कपाट, कुलर आदी वस्तूंची तोडफोड करून नुकसान केले.
हा प्रकार शुक्रवारी (दि. १४) रोजी दुपारी तीनच्या सुमारास थेरगाव वाकड येथे घडली. चारुशीला किशोर जाधव, किशोर भीमराव जाधव (रा. थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या घरमालक पती-पत्नीची नावे आहेत. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.











