- रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, अन्नदान व शिधावाटप होणार…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.०२ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती विलासभाऊ मडिगेरी यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, ५ जुलै २०२६ रोजी भोसरी परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री साई चौक मित्र मंडळ आणि श्री विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हे कार्यक्रम होणार आहेत.
सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सेक्टर ९, इंद्रायणीनगर येथील वैष्णोमाता मंदिर प्रांगणात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी १० ते ११ या वेळेत चैतन्य पार्क, सेक्टर क्रमांक १ तसेच प्रभाग क्रमांक ८ मधील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
सायंकाळी ५.३० वाजता वैष्णोमाता मंदिर प्रांगणात प्रभाग क्रमांक ८ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
याशिवाय सामाजिक बांधिलकी जपत पताशीबाई लुंकड अंध शाळेत अन्नदान, शिधावाटप व फळवाटप, पांजरपोळ गोशाळेला चारा मदत तसेच यशवंतराव आश्रम स्कूल, गुळवे वस्ती येथे विद्यार्थ्यांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या सर्व उपक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदानासह विविध सामाजिक कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.















