- या लिंकवर क्लीक केल्यास मिळेल वाहतुकीची ऑनलाईन माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०४ जुलै २०२६) :- संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी ४ ते ८ जुलै, तर संत तुकाराम महाराज पालखीसाठी ५ ते ८ जुलै या कालावधीत पालखी मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. आळंदी आणि देहू येथे भाविकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी दिली.
संत तुकाराम महाराजांची पालखी ७ जुलै रोजी देहूतून प्रस्थान करून ८ जुलै रोजी आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्काम करणार आहे. या काळात देहू कमान ते भक्ती-शक्ती चौक, तळवडे आयटी पार्क चौक ते खंडेलवाल चौक तसेच पालखी मार्गावरील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. तसेच ८ जुलै रोजी भक्ती-शक्ती चौकापासून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून पिंपरी, निगडी, नाशिक फाटा, दापोडी, सांगवी आदी भागातील अनेक मार्गांवर वाहतूक निर्बंध असतील.
दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ८ जुलै रोजी आळंदीतून प्रस्थान करून पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे. या दिवशी चाकण, मोशी, मरकळ, चिंबळी, शेलपिंपळगाव, विश्रांतवाडी, बोपखेल आदी भागातून आळंदीकडे जाणारे मार्ग बंद राहतील. मात्र, पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे.
देहू व आळंदी येथे भाविकांसाठी विविध ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली असून, नागरिकांनी वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती देणारी लिंक खाली देण्यात येत आहे. सदर लिंकवर क्लिक केल्यास बंद करण्यात आलेले मार्ग तसेच पर्यायी मार्गांची माहिती उपलब्ध होईल…
https://www.google.com/maps/d/u/3/edit?hl=en&mid=17YdOe3GZfJoP3TK-kXPH3qnvHekT9kE&ll=18.68566386040102%2C73.88493089101564&z=12
https://www.google.com/maps/d/u/3/edit?hl=en&mid=1C04OEaZ2vsXuxyKOLc3Dl4lSvs8DuK0&ll=18.716347182603883%2C73.83888494071857&z=11
















