न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मोशी (दि. ८ जुलै २०२६) :- मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून देहूरोड येथील भारतीय सेनेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या पथकात ४ अधिकारी आणि २५ जवानांचा समावेश आहे.
एनडीआरएफ, महापालिकेचे अग्निशमन दल, पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त प्रयत्नांत आतापर्यंत ४ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून त्यामध्ये १ महिला आणि ३ पुरुषांचा समावेश आहे.
ढिगाऱ्याखाली आणखी नागरिक अडकले असण्याची शक्यता लक्षात घेऊन शोध व बचाव मोहीम वेगाने सुरू असून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

















