न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील महिलांसाठी मोफत चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर १००% नोकरी या तत्वावर उपक्रमाचे आयोजन, राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा धर यांनी केले आहे.
या उपक्रमात सहभाग नोंदविण्यासाठी महिलेचे वय २२ ते ३५ वर्ष या दरम्यान असावे. तसेच महिलेचे शिक्षण इयत्ता सातवी पास असावे. तरी जास्तीत जास्त महिलांनी या उपक्रमात सहभाग नोंदविण्यासाठी ९५९५९५२३०१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावे, असे आवाहन नगरसेविका सुलक्षणा धर यांनी केले आहे.











