न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०१९) :- गुगलवर नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर ”एकाने तुम्हाला हुँदाई कार कंपनीमध्ये नोकरी मिळाली आहे. तुम्ही घरून काम करू शकता” असे सांगून ज्येष्ठ नागरिकाला १ लाख १० हजारांचा गंडा घातला.
ही घटना ११ ते १४ एप्रिल या कालावधीत निगडी येथे घडली. याप्रकरणी जोसेफ रजिनाल्ड मॅडसा (वय ६१, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.













