न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०१९) :- शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्ला येथे आई एकवीरामातेच्या चरणी पहाटे अभिषेक करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, तालुकाप्रमुख राजू खांडभोर, देहू शहरप्रमुख सुनील हगवणे, उपतालुकाप्रमुख मदन शेडगे व शिवसेना पदाधिकारी-शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
तसेच पिंपरी-चिंचवड, आकुर्डी येथे स्वच्छता कर्मचारी बांधवांचा, स्वच्छतादूतांचा हँडग्लोव्हज, मास्क, सुरक्षा साहीत्य व मिठाई देऊन सन्मान करण्यात आला.

काळेवाडी, रहाटणी येथे ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त ५३ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, शहर संघटिका उर्मिला काळभोर, पिंपरी-चिंचवड विधानसभा संघटिका सरिता साने, अनीता तुतारे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, युवसेनेच्या शर्वरी जळमकर, उपशहरप्रमुख हरेश नखाते, विभागप्रमुख प्रदीप दळवी, गोरख पाटील, अंकुश कोळेकर, ज्ञांनेश्वर शिंदे, आबा दांगट, बाळासाहेब वाल्हेकर, सुनीता चव्हाण, वैशाली काटकर, पल्लवी दांगट, वैशाली कुलथे, शारदा वाघमोडे, कामिनी मिश्रा, शैला निकम, स्वरूपा खापेकर, उषा आल्हाट, साधना तरस आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.













