न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या असंघटीत कामगार संघटनेच्या वतीने अखिल भारतील काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांचा ५० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. शहर कॉग्रेस अध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय सेवादल सहसचिव मा. संग्राम तावडे, असंघटित कामगार काँग्रेस अध्यक्ष आयु. सुंदर कांबळे, युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मयुर जैस्वाल, सेवादल श्हराध्यक्ष मकरध्वज यादव, ज्येष्ठ नागरिक शहराध्यक्ष लक्ष्मण रूपनर, पिंपरी चिंचवड सरचिटणीस आण्णा कसबे,एनएसयूआय मा. अध्यक्ष विशाल कसबे, महिला काँग्रेस सरचिटणिस शोभाताई मिरजकर, पिंपरी विधानसभा अध्यक्षा उमा शेख, भोसरी विधानसभा अध्यक्षा सत्वशिला इटकर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी पिंपरी विधानसभा उपाध्यक्षपदी संजना कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल कोतवाल यांनी केले व आभार भोसरी विधानसभा उपाध्यक्षा सविता धांडे यांनी मानले.













