न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे :- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरुद्ध बॉलीवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केलेल्या अवमानकारक वक्त्व्याविरूध्द पुणे मनसेच्या वतीने शिवाजीनगर प्रथम न्यायदंडाधिकारी पुणे, यांचे न्यायालयात तनुश्री दत्ता हिचेविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे.
यात भा. द. वि. १४३, १५३ अ, ५०३, ५०५ अन्वये योग्य त्या कलमांतर्गत खटला दाखल करण्यात आला असून, मा. न्यायाधीश यांच्याकडे पुणे शहर मनसेच्या वतीने न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.
सदर खटल्याचे कामकाज मनसेच्यावतीने अँड. साजीद खान यांनी पाहिले. यावेळी मनसेच्या विशाखा गायकवाड, प्रभाग अध्यक्ष गणेश पाटील, महेश शिर्के व मनोज ठोकळ हे फिर्यादी उपस्थित होते.













