न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रावेत (दि. ०१ ऑक्टोबर २०२६) :- गौरी-गणपतीच्या सणानिमित्त घरातील एकविरा देवीच्या मूर्तीला घातलेले सोन्याचे मंगळसूत्र पेंडलसह चोरी करणाऱ्या मोलकरणीला शिरगाव परंदवडी पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून ३०.५४६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र पेंडलसह, असा एकूण २ लाख ८४ हजार ८४७ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत २६ सप्टेंबर २०२६ रोजी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांच्या घरातील गौरी-गणपती सणाच्या अनुषंगाने एकविरा देवीच्या मूर्तीला घातलेले सोन्याचे मंगळसूत्र पेंडलसह चोरी झाल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने घरकाम करणाऱ्या महिलेकडे कौशल्यपूर्ण पद्धतीने चौकशी केली. तपासादरम्यान संबंधित महिलेने चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर गजरा सातप्पा कांबळे (वय ४५, रा. आकुर्डी ) हिला अटक करण्यात आली. तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) बसवराज तेली, पोलीस उपायुक्त परिमंडळ-४ श्वेता खेडकर आणि सहायक पोलीस आयुक्त देहुरोड विभाग प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पारखे, पोलीस हवालदार किशोर गिरीगोसावी, सचिन काचोळे तसेच पोलीस अंमलदार प्रसाद जंगीलवाड, दिलीप राठोड आणि सागर कोळी


















