न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०१ ऑक्टोबर २०२६) :- भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पिंपरी चिंचवड , हिंदू गर्जना प्रतिष्ठान व अनुप मोरे सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यांच्या देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र भाई मोदी यांच्या ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत ‘सुरक्षित युवा, सशक्त भारत’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.प्रमुख वक्ते म्हणून डॉ.अजय दुधाने सर तसेच डॉ विजय मोरे सर यांनी मार्गदर्शन केले.
युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम आणि जबाबदार जीवनशैली स्वीकारावी, तसेच नशामुक्त समाजाच्या निर्मितीसाठी युवकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
या कार्यक्रमास आमदार शंकरभाऊ जगताप, भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न( बापू )काटे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे सर, संघटन सरचिटणीस मोरेश्वरदादा शेडगे, माजी उपमहापौर शैलजाताई मोरे, सरचिटणीस वैशाली ताई खड्ये, सरचिटणीस मधुकरजी बच्चे, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेशभाऊ यादव, महिला मोर्चा अध्यक्ष सुजाताताई पालांडे, नगरसेवक तुषारभाऊ हिंगे, ल प्रभाग अध्यक्ष रेखाताई देवकर,नगरसेवक उदयभाऊ गायकवाड, माजी नगरसेवक माऊली काका थोरात, मंडल अध्यक्ष मंगेशदादा घाडगे, शहर सचिव महेंद्रजी बाविस्कर, युवा मोर्चा प्रदेश सचिव अजितजी कुलथे, नंदू (आप्पा) कदम, युवराजजी लांडे, किरण (अण्णा)सुवर्णा,सुरेशकाका गदिया, साची ताई दोषी,कैलास मोरे सर, यांच्यासह भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस सुमित घाटे, युवा मोर्चा सरचिटणीस राहुल खाडे आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सन्मान घाडगे ,कृष्णा कदम,किरण लोखंडे,प्रतीक पाटील,यश सांभेराव ,प्रशांत आलमेल यांनी विशेष पुढाकार घेत मोलाचा सहभाग नोंदविला.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने युवक-युवती तसेच विद्यार्थी उपस्थित होते. ‘नशामुक्त भारत, सुरक्षित युवा आणि सशक्त राष्ट्र’ या संकल्पनेचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.


















