न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०१ ऑक्टोबर २०२६) :- क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित, न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल रहाटणी पुणे येथे २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात व आदरपूर्वक साजरी करण्यात आली.
यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, उपमुख्याध्यापक सचिन सचिन कळसाईत तसेच सर्व शिक्षकवृंद विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मेघा विभुते मॅडम यांच्या सुंदर सूत्रसंचालनाने झाली. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर, देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानावर तसेच त्यांच्या प्रेरणादायी विचारांवर प्रकाश टाकण्यात आला.
यावेळी श्वेता भालेराव मॅडम यांनी इंग्रजी भाषेतून महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याची माहिती देणारे प्रेरणादायी भाषण केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे भाषणे सादर केली. LKG मधील निहारिका पवार आणि UKG मधील आरिका पवार यांनी इंग्रजी भाषेतून सुंदर भाषणे सादर केली.
त्यानंतर निशा मॅडम यांनी मराठी भाषेतून दोन्ही महान नेत्यांच्या विचारांचे व कार्याचे महत्त्व स्पष्ट केले. त्यानंतर इयत्ता ३ रीतील रुद्र पिसे आणि इयत्ता ५ वीतील दीपिका राठोड यांनी मराठी भाषेतून महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले.
यानंतर सोनाली पतंगे मॅडम यांनी हिंदी भाषेतून दोन्ही महान नेत्यांच्या देशभक्ती, साधेपणा, सत्य आणि अहिंसेच्या विचारांवर प्रकाश टाकला. त्यानंतर इयत्ता ६ वीतील हनुमंता आणि इयत्ता ८ वीतील सृष्टी यांनी हिंदी भाषेतून प्रेरणादायी भाषणे सादर केली.
कार्यक्रमाच्या शेवटी उर्मिला मॅडम यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमात उपस्थित असलेल्या अध्यक्ष, उपमुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद आणि सहभागी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना सत्य, अहिंसा, साधेपणा, शिस्त, देशप्रेम आणि समाजसेवा या मूल्यांची प्रेरणा मिळाली. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.


















