न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी, दि. 11 ऑक्टोबर २०२६ :- बहुजन समाज पार्टीचे संस्थापक, बहुजननायक कांशीराम साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त बसपाच्या वतीने भोसरी विधानसभा मतदारसंघात संघटनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
बालाजीनगर सेक्टरची बांधणी, बूथ निर्मिती आणि पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
भोसरी विधानसभा प्रभारी बालराज कटके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कार्यक्रमाला पुणे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, पुणे जिल्हा महासचिव प्रवीण वाकोडे आणि भोसरी विधानसभा अध्यक्ष महेश प्रक्षाळे उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून चळवळ वाढीसाठी कार्य करण्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
बहुजन समाज पार्टीचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


















