- सुषमा अंधारे आणि अनिल परब करणार मेळाव्याला मार्गदर्शन..
- शिवसैनिकांसह पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – शहराध्यक्ष चेतन पवार…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. 13 ऑक्टोबर 2026) :- पुणे पदवीधर मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील मोदी यांच्या प्रचारार्थ बुधवारी (१४ ऑक्टोबर) पिंपरी येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि आमदार अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा होणार आहे.
हा मेळावा बुधवारी सकाळी १२ वाजता जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील हिंदुस्तान पेट्रोलियमजवळील कृष्णा पॅलेस येथे आयोजित करण्यात आला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराला गती देणे आणि पक्षाची भूमिका पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचवणे, या दृष्टीने या मेळाव्याला महत्त्व आहे.
या कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संबंधित क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात सुषमा अंधारे आणि आमदार अनिल परब काय मार्गदर्शन करतात, तसेच उमेदवार सुनील मोदी यांच्या प्रचारासाठी पक्षाकडून कोणती दिशा निश्चित केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
चेतन पवार यांचे आवाहन…
याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख चेतन पवार म्हणाले, “पुणे पदवीधर मतदारसंघाचे पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील मोदी यांच्या प्रचारासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित राहावे. उमेदवाराच्या प्रचाराला बळ देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.” असे आवाहन पवार यांनी केले आहे.

















