न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील नव्या जुन्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आता उभी फूट पडली आहे. निष्ठावंतांनी आता व्यक्त होण्यासाठी त्यांची स्वतंत्र चूल मांडली असून, ‘अटलबिहारी वाजपेयी विचार मंच’ या नावाने संस्थेची स्थापना केली आहे. आजवर ओल्ड इज गोल्ड नावाने कार्यरत प्रमुख कार्यकत्यांनी शनिवारी (दि. २२) रोजी ऑटो क्लस्टर हॉल येथे या निमित्ताने शक्तीप्रदर्शन केले.
संस्थेमार्फत खासदार अमर साबळे यांचा राज्यसभेच्या प्रतीतपदी फेरनियुक्ती झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला. भाजपचे माजी शहराध्यक्ष बाळकृष्ण नाईक, मधु जोशी, अमृत पहाड, डॉ. प्रतिभा लोखंडे, सत्ताधारी नेते एकनाथ पवार व प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला. याच सोहळ्यात राज्य लोकलेखा समिती अध्यक्ष सचिन पटवर्धन, प्राधिकरण अध्यक्ष खाडे, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष अमित गोरखे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडेगिरी, विधी समिती अध्यक्ष अश्विनी बोबडे, ‘ह प्रभाग’ अध्यक्ष योगीता नागरगोजे, शहर सुधारणा समिती अध्यक्ष राजेन्द्र लांडगे याचाही सत्कार करण्यात आला.
खा. अमर साबळे म्हणाले की, शासनाच्या योजनांचा लाभ, त्याचप्रमाणे आगामी काळात मिळणाऱ्या संधी या जास्तीत जास्त जुन्या कार्यकत्यांना कशा मिळतील यासाठी काम करणार आहे. तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन पक्षासाठी अहोरात्र काम करणा-या या सगळ्या निष्ठावंत कार्यकत्यांच्या पाठिशी ठामपणे पाठीशी राहणार असल्याचेही सांगीतले.
यावेळी प्रदेश चिटणीस खापरे, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, शहर सरचिटणीस प्रमोद निसळ यांच्यासह नगरसेवक शितल शिंदे, नामदेव ढाके, रवी लांडगे, संदिप वाघिरे, अनुराधा गोरखे, संदीप कस्पटे, निवृत्ती राऊत, वसंत शेवडे, अॅड. एस. बी. चांडक, नंदू कदम, दामोदर गव्हाणे, जगदीश शेट्टी, माणिकराव अहिरराव, संजय मंगोडेकर, प्रकाश जवळकर यांच्यासह मोठ्या संख्येने निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते.सत्कारमूर्तीनी जुन्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी तर, सुत्रसंचलन स्विकृत सदस्य मोरेश्वर शेडगे यांनी केले. आभार नगरसेवक माऊली थोरात यांनी मानले.















