न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०१९) :- स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे हॉटेल्स, पालिका व खासगी शाळा, रुग्णालय, हाऊसिंग सोसायटी, मोहल्ला मार्केट, मंडई या गटांत स्वच्छता स्पर्धा आयोजित केली आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालय किंवा पालिका भवनातील स्वच्छ भारत अभियान अंमलबजावणी कक्षात २५ जूनपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. पालिकेच्या वतीने या स्पर्धेचे दरवर्षी आयोजन केले जाते.
परिसरातील साफसफाई, शौचालय साफसफाई, देखभाल व दुरूस्ती, ओला व सुका कचरा वर्गीकरण असणे आवश्यक आहे. तसेच, गुगल प्ले स्टोअरमधून ‘स्वच्छता एमओयुएचए’ हे अॅप डाऊनलोड करणे आवश्यक आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज पालिकेच्या www. pcmcindia. gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. स्पर्धेत अधिकाधिक संस्था व आस्थापनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी केले आहे.


















