न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०१९) :- कै. रामचंद्र भिसे (गुरुजी) वैद्यकिय प्रतिष्ठानच्या वतीने संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारक-यांसाठी श्रीमती सोनियाजी राजीवजी गांधी फिरता मोफत दवाखान्याच्या माध्यमातुन आरोग्य सेवा दिली जाणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ विजय भिसे यांनी ही माहिती दिली. संस्थेतर्फे पालखी सोहळ्यातील वारक-यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहेत. यंदा रूग्णवाहिका सेवाही पुरविण्यात येणार आहे.
त्याचबरोबर पालखी मार्गावर मोफत तपासणी व औषधोपचार करणाच्या संस्थांना ही औषधांची मदत केली जाणार आहे. या उपक्रमात डॉ. अप्पा आटोळे व डॉ. योगेश पाटील सहभागी होणार आहेत. त्यांना राजेंद्र गायकवाड सहकार्य करणार आहेत.


















