न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०१९) :- आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून आज सोमवार (दि. २४) रोजी दुपारी प्रस्थान ठेवणार आहे. त्यासाठी सर्व स्तरांवरील तयारी पूर्ण झाली असून, सोहळ्यासाठी अवघी देहनगरी सज्ज झाली आहे. संस्थानच्या वतीने पालखी प्रस्थानाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
प्रस्थानानिमित्त गेला आठवडाभर भजनी मंडपातील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. या वर्षी सोहळा समाप्तीनिमित्त ह. भ. प. रामदास नाना मोरे काल्याचे कीर्तन करणार आहेत. संस्थानने देऊळवाड्यात खासगी सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. पोलिसांचाही खडा पहारा ठेवण्यात आला आहे. आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, पाणीपुरवठा, महावितरण, पाटबंधारे विभाग, अन्न व औषध विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग, पोलिस यंत्रणा, वाहतूक विभाग, राज्य परिवहन महामंडळ, पुणे महानगर परिवहन महामंडळ आदी विभागांची तयारी पूर्ण झाली आहे.















