न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०१९) :- पूर्वाश्रमीचे विरोधी पक्षनेते व आता राष्ट्रवादी काँगेसमध्ये सक्रिय असंलेले माजी नगरसेवक मछिंद्र तापकीर यांनी नुकतीच शहर राष्ट्रवादी काँगेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे ते कोणत्या पक्षात प्रवेश करतात. याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली दिसते.
तापकीर यांना आतापर्यंत भाजप, वंचित आघाडी, मनसे व काही पक्षांकडून त्यांच्या पक्षात पक्षप्रवेश करण्याची मागणी त्या-त्या पक्षांच्या वरिष्ठांकडून करण्यात आली होती. मात्र, अद्यापपर्यंत तरी तापकीर यांनी आपले गुलदस्त्यातील पत्ते ओपन केलेले नाहीत.
नुकतेच तापकीर यांनी भाजपचे नवनिर्वाचित कामगार, पर्यावरण व पुनर्वसन राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांची राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल भेट घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर काही तास तापकीर व भेगडे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेदरम्यानचा मजकूर तापकीर यांनी खुला केला नसला, तरी, ते सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करण्यावर ठाम असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. तसेच त्यांना भाजप कार्यकारिणीवर मोठ्या पदाची ऑफर दिल्याचेही सूत्रांनी सांगितले.













