न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी प्रतिनिधी :- शिवशाही व्यापारी संघाच्या उल्हासनगर क्र. २, महात्मा गांधीनगर विभागाच्या विभागप्रमुखपदी कृष्णा अभिमान गायकवाड यांची निवड करण्यात आली. शिवशाही व्यापारीसंघाचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.
प्रदेश सचिव गणेश आहेर यांनी नवनियुक्त विभागप्रमुख कृष्णा गायकवाड यांना शिवशाही व्यापारी संघाच्या माध्यमातून उद्योजक व लघुउद्योजक यांच्या समस्या सोडवणे व उल्हासनगर परिसरात शिवशाही व्यापारी संघाची व्याप्ती वाढवण्यासंदर्भात सूचना केल्या.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष गोरख पाटील, दत्ता क्षिरसागर, बाळासाहेब गायकवाड, मारूती म्हस्के आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.