- रावेत परिसरात सतर्कतेचा इशारा..
- पाणीपातळी अचानक बदलण्याची शक्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २९ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड परिसरासाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. पवना धरणातून आज (दि. २९) रोजी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पवना धरण शाखेकडून देण्यात आली.
उपविभागीय अधिकारी, पवना उपविभाग यांच्या सूचनेनुसार सिंचन विमोचकाद्वारे ४०० क्युसेक क्षमतेने नदीपात्रात विसर्ग केला जाणार आहे. तसेच रावेत येथील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दुपारी २ वाजता जलविद्युत केंद्रातून न्यूनतम १००० क्युसेक क्षमतेने सुमारे ८ McFt अतिरिक्त पाणी सोडण्यात येणार आहे.
या एकत्रित विसर्गामुळे रावेत परिसरातील नदीपातळी अचानक कमी किंवा वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे व सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.












