न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संघटनेकडून (ISO) विदयानंद भवन हायस्कूल या संस्थेला आय. एस. ओ. प्रमाणपत्र लाभले. आंतरराष्ट्रीय मान्यता संघटना (ISO) वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये संचालक मान्यता प्रतिनिधी देणारी एक आंतरराष्ट्रीय मान्यता संघटना आहे. या संस्थेने विदयानंद भवन हायस्कूल या शालेय संस्थेला प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे. विदयानंद भवन ही शालेय संस्था खाजगी संस्था आहे.
आंतरराष्ट्रीय मान्यता संघटना (ISO) ९००१ : २०१५ या संघटनेचे ध्येय आहे की क्षमतांचा विकास साधावा व कार्यक्षमतेत वाढ व्हावी. या संघटनेकडून विदयानंद भवन हायस्कूल या शाळेला प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. या शाळेचे भरत चव्हाण पाटील, संचालक डॉ. जे. जी. पाटील, डॉ. डी. आर. करनुरे, मुख्याध्यापिका छाया हब्बू यांनी स्वीकारले.
संस्थेने ध्येय ठेवले की विद्यार्थ्याच्या बौद्धिक क्षमतेत वाढ करण्यास सतत प्रोत्साहन तसेच विचारक्षमता, दक्षता तसेच इतर क्षमतेत सतत वाढ करण्याचा प्रयत्न आहे भविष्यात असेल. ही संस्था नेहमी विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करते. तसेच त्यांच्या इतर क्षमतेमध्ये विकास करण्याचा प्रयत्न करते व भविष्यातही करेल, असे आश्वासन संस्थेचे अध्यक्ष भरत चव्हाण पाटील यांनी दिले.
अनेक संस्था या प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव ठेवतात पण विदयानंद भवन या शालेय संस्थेने यावर्षी हा प्रस्ताव ठेवला व संस्थेला यावर्षी आंतरराष्ट्रीय मान्यता संघटने कडून मान्यता प्राप्त झाली.