न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २९ एप्रिल २०२६) :- वारकरी संप्रदायाची पताका अभिमानाने खांद्यावर वाहणारे हभप विलास सुदाम यादव यांची जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या चिंतन समिती सदस्यपदी निवड झाली आहे. या निवडीमुळे वारकरी संप्रदायात समाधान आणि अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
विलास यादव यांनी संत तुकाराम महाराजांच्या विचारधारेचा वारसा जपत कीर्तन-प्रवचन, समाजप्रबोधन आणि अध्यात्मिक मूल्यांचा प्रसार करण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या कार्यामुळे वारकरी परंपरेतील संस्कार, संत साहित्य आणि भक्तीची परंपरा अधिक दृढ होत असल्याचे मानले जाते.
या निवडीमुळे संत विचारांचा प्रचार-प्रसार अधिक व्यापक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील कार्यकाळात समाजाला सकारात्मक दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.












