न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे गुरुवारी (दि. २७) केली जाणार आहेत. यासाठी शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.
त्यामुळे गुरुवारी सायंकाळी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुस-या दिवशी शुक्रवारी (दि. २८) रोजी पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारी (दि. २६) व शुक्रवारी दुपारी संध्याकाळी पाणी कपातीमुळे पाणी बंद असणा-या भागास त्या-त्या दिवशी नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे.
त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी केले आहे.















