न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०१९) :- हरीनामाचा गजर करीत टाळ मृदुंगाच्या गजरात पिंपरी चिंचवड शहरात आज सकाळी दाखल झालेल्या आषाढीवारी पालखी सोहळ्यातील संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत महापौर राहुल जाधव, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते मॅगझीन चौक, आळंदी फाटा, भोसरी येथे करण्यात आले.

यावेळी शहर सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे, क प्रभाग अध्यक्षा यशोदा बोईनवाड, इ प्रभाग अध्यक्षा सुवर्णा बुर्डे, नगरसदस्या नम्रता लोंढे, प्रियंका बारसे, निर्मला गायकवाड, विनया तापकीर, नगरसदस्य नितीन काळजे, ॲड. सचिन भोसले, लक्ष्मण उंडे, सागर गवळी, स्विकृत सदस्य सागर हिंगे, दिनेश यादव, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुर्गुडे, आशा राऊत, अण्णा बोदडे, श्रीनिवास दांगट, कार्यकारी अभियंता प्रविण घोडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, माहिती व जनसंपर्कचे रमेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.















