न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी छञपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस महापौर राहूल जाधव व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी विधी समिती सभापती अश्विनी बोबडे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, नगरसदस्या अनुराधा गोरखे, मंगला कदम, नगरसदस्य केशव घोळवे, अतिरिक्त आरोग्य वैदयकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, अण्णा बोदडे, कोल्हापुर जिल्हा मित्र मंडळाचे पांडुरंग पाटील, जगदीश परीट, कुशाग्र कदम, मिलिंद वेल्हाळ, सुनिल पाटील, योगेश मोटे, पी.बी.पाटील, पी.वाय.पाटील आदी उपस्थित होते.

आज सकाळी चिंचवड येथील त्यांच्या पुर्णाकृती पुतळयासही महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, क्रिडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती तुषार हिंगे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, नगरसदस्या अनुराधा गोरखे, मंगला कदम, नगरसदस्य केशव घोळवे, बाबासाहेब त्रिभुवन, माजी नगरसदस्य मारुती भापकर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता सुनिल वाघुंडे, उपअभियंता सुनिल नरोटे, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, बापू गायकवाड, संभाजी पार्टे, मिलिंद वेल्हाळ, आदी उपस्थित होते.















