न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०१९) :- महिंद्रा सिंटर्ड कामगार संघटनेच्या वतीने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पिंपरी येथील आंबेडकर चौकामधे फळे वाटप करण्यात आले.
प्रत्येक वर्षी हे कार्य संघटना करत आहे. या प्रसंगी संघटनेचे जनरल सेक्रेटरी शिवाजी सोनवणे, उपाध्यक्ष प्रमोद मोरे, सेक्रेटरी संजय सुर्वे, कोषाध्यक्ष अनिल भुजबळ, प्रतिनिधी निलेश शिनलकर, दीपक गौड, प्रशांत चौगुले व वर्क्स कमिटी सदस्य अमोल मुलगे, समीर मोटारचे, तेजस काकडे आदी उपस्थित होते.















