न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०१९) :- प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या =मॉडर्न हायस्कूलमध्ये राजर्षी शाहू महाराज यांची १४५ वी जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. प्रसंगी शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा मुख्याध्यापिका संगीता लकारे यांनी सांगितला.
तसेच प्रशालेतील शिक्षक सतीश लिंबेकर यांनी शाहू महाराजांच्या कार्याचा इतिहास सांगितला. कार्यक्रमास उपस्थित प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका रोहिणी काळे, पर्यवेक्षिका सीमा कुळधरण, उत्सव समिती प्रमुख सुमिता पाटील तसेच प्रशालेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
उपक्रमाचे कौतुक प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे व सहकार्यवाह प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांनी केले.















