न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०१९) :- जय भगवान महासंघ पुणे जिल्हा यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना अत्यावश्यक वस्तू व खाद्यपदार्थ आणि तज्ञ डॉक्टरांच्या तर्फे आरोग्य तपासणी करून मोफत औषध वाटप करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती नवनगर प्राधिकरण अध्यक्ष मा. सदाशिव खाडे, जय भगवान महासंघ पुणे जिल्हा अध्यक्ष प्रा.गणेश ढाकणे, खंडू खेडकर (जय भगवान शिक्षक महासंघ पुणे जिल्हा अध्यक्ष ), अमोल नागरगोजे (पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष ), विजय सोनवणे (व्यापारी आघाडी अध्यक्ष पिंपरी चिंचवड) ,कैलास सानप (संघटक), शहादेव सानप (आळंदी विभाग प्रमुख), हनुमंत घुगे (उपाध्यक्ष), उद्धव सानप, उद्धव डिघोळे, गोरक्ष सानप, विकास आघाव (पश्चिम महाराष्ट्र संघटक), डॉ.एकनाथ गोपाळघरे (मावळ तालुका अध्यक्ष),लक्ष्मण वाघ , भागवत खेडकर (पिंपरी-चिंचवड उपाध्यक्ष), जयश्री खरमाटे, आश्रुबा पालवे , सतीश आव्हाड, अक्षय सोनवणे ,अक्षय वैरागे, यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पडला.


















