न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०१९) :- शिवसेनेच्या वतीने मावळ तालुक्यामध्ये चार ठिकाणी पीकविमा मदत केंद्र उभारण्यात आलेले असून, मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीकविमा योजनेसंदर्भात असलेल्या अडी अडचणी व तक्रारी संदर्भात मावळ तालुका कृषी अधिकारी यांची वडगाव येथे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.
यावेळी पीकविमा योजनेतील मागील वर्ष २०१८-१९ मधील ३५०० शेतकऱ्यांचा पीकविमा PDCC बँकेमार्फत उतरविला गेला तालुका कृषी अधिकारी यांच्या नियंत्रण कक्षेत ३ मंडळ अधिकारी, ६ कृषी पर्यवेक्षक, व ३६ कृषी सहाय्यक असा ५१ जणांचा स्टाफ कार्यरत असल्याचे निदर्शनास आले परंतु PDCC बँकेव्यतिरिक्त इतर ठिकाणी फक्त दोनच स्वयंस्फूर्तीने शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविल्याचे निदर्शनास आले.
मागीलवर्षीच्या कामाबाबत आढावा घेऊन पीकविमा २०१९-२० या चालू वर्षात जास्ती जास्त शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविण्यासाठी २४ जुलै २०१९ ही अंतीम तारीख असल्याने भात, नाचणी, भुईमुग, क्षेत्रामधील शेतकऱ्यांनी जास्ती जास्त पिकविमा उतरविण्यासाठी व पीकविम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळण्यासाठी इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीकडे योग्य तो पत्रव्यवहार, पाठपुरावा करणेबाबत या बैठकीत आढावा घेण्यात आला.
या प्रसंगी तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, तसेच मंडल अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व शिवसेना जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, तालुका प्रमुख राजु खांडभोर, व प्रमुख शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.











