न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०१९) :- प्रकाश भेंडे यांचा पिंपळे सौदागर येथे गोविंद गार्डनजवळ विदा हाऊसिंग सोसायटी येथे फ्लॅट आहे. २१ जून २०१८ ते २५ जून २०१९ या कालावधीत आरोपी सुरेश त्यांच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता.
त्याने महसूल विभागातून ॲडिशनल कमिशनर या पदाचा राजीनामा दिला असून, त्याला महाराष्ट्र राज्याचा गव्हर्नर करणार आहेत, अशी प्रकाश यांच्याकडे बतावणी केली. त्याचे काम पुणे आणि मुंबई येथे सुरू असल्याने पुण्याच्या मध्यवर्ती भागात फ्लॅट हवा असल्याचे सांगत प्रकाश यांचा विश्वास संपादन केला.
२६ नोव्हेंबर २०१८ रोजी तो प्रकाश यांच्या फ्लॅटमध्ये राहण्यास आला. त्याने प्रकाश यांना डिपॉझिट दिले नाही. तसेच भाडे, लाईट बिल, गॅस बिल दिले नाही. फ्लॅट मधील विंडो एसी काढून नेला. सुरेश लोहार याने प्रकाश भेंडे याची एकूण ४ लाख ८ हजार ४९५ रुपयांची फसवणूक केली. प्रकाश दिनकर भेंडे (वय ५९, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुरेश लोहार उर्फ नंदकुमार रंगनाथ कांबळे (रा. अकलूज, सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.











