न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०१९) :- येत्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीस इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लेखी अथवा ऑनलाईन पद्धतीने १ जुलैपर्यंत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात किंवा जिल्हाध्यक्ष अथवा पक्ष कार्यालयात जमा करावेत.
संकेतस्थळावरही ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. या अर्जांची छाननी ३ जुलै रोजी होऊन जुलैच्या दुस-या आठवड्यापर्यंत इच्छुक उमेदवारांची यादी अंतिम केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड व भोसरी विधानसभेतून इच्छुकांनी पक्षकार्यालयाकडे अर्ज सादर करण्याची लगबग लवकरच सुरु होईल.चिंचवड विधानसभेतून भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मयुर कलाटे, पिंपरीतून अण्णा बनसोडे, सुलक्षणा धर, शेखर ओव्हाळ, आणि भोसरीतून विलास लांडे, दत्ता साने आदी राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत.











